Union Budget 2025: अर्थसंकल्पातील महत्वाच्या दहा घोषणा…कोणासाठी काय?

allroundcontent
7 Min Read

शेवटी आपण कमवतो तरी कोणासाठी?
आपल्या स्वतःसाठी की निर्मला ताईंसाठी?
जो कुणी चांगली कमाई करतो, त्याच्या डोक्यावर एक मोठा टेन्शन असतो – टॅक्स!

पण यावेळीच्या बजेटमध्ये निर्मला ताईंनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
गेल्या दोन दिवसांत तुम्ही बजेटबद्दल बरीच माहिती ऐकली असेल, न्यूज पाहिल्या असतील.
आज मी सोप्या शब्दांत फक्त १० पॉइंट्समध्ये सांगणार आहे की या बजेटमध्ये काय बदल झाले आहेत.

यातील एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जो भारताला एका क्षेत्रात ग्लोबल लीडर बनवेल!
म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मिडल क्लाससाठी बजेट – दिलासा की निराशा?

आपला मिडल क्लास हा देशातील सर्वात मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्यांचं समाधानी असणं खूप महत्त्वाचं आहे.
हा बजेट मिडल क्लासच्या स्वप्नांना पूर्तता देईल की पुन्हा निराशाच मिळेल?

चला तर मग, जाणून घेऊया या बजेटमधील महत्त्वाचे बदल:

१. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली!

आता ₹12.75 लाख पर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.
याआधी यूपीए सरकारच्या काळात ही सूट फक्त ₹2.5 लाख होती, जी आता मोदी सरकारने ₹12.75 लाख पर्यंत वाढवली आहे.कलम ८७अ अंतर्गत सवलत मर्यादा देखील वाढवली आहे. या बदलांमुळे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी कर दायित्व शून्य होईल. “पगारदार व्यक्तींसाठी, ७५,००० रुपयांच्या मानक वजावटीमुळे शून्य मर्यादा १२.७५ लाख रुपयांपर्यंत वाढेल. कलम ८७अ मध्ये २५,००० रुपयांवरून ६०,००० रुपयांची सवलत देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे,” असे मुंबईस्थित चार्टर्ड अकाउंटंट सुरेश सुराणा म्हणतात. काही अटी पूर्ण केल्यास कर सवलत देय करात कपात करण्याची परवानगी देते.दिवाण पीएन चोप्रा अँड कंपनीचे डायरेक्ट टॅक्स पार्टनर परवीन कुमार म्हणतात की ही सवलत फक्त पगाराच्या उत्पन्नावरील करावर लागू होते, भांडवली नफ्यावर नाही.

भांडवली नफ्यावर कर लागू होतो  कलम ८७अ अंतर्गत मिळणारी सवलत भांडवली नफा किंवा लॉटरी जिंकण्यासारख्या विशेष दराने कर आकारल्या जाणाऱ्या उत्पन्नावर लागू होत नाही. “उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने १४ लाख रुपये कमावले, ज्यामध्ये दीर्घकालीन भांडवली नफ्यातून मिळालेल्या ३ लाख रुपयांचा समावेश आहे, तर ही सवलत भांडवली नफ्यावर लागू होणार नाही, ज्यावर १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सवलत उपलब्ध असूनही १२.५ टक्के कर आकारला जाईल,” असे नांगिया अँडरसन एलएलपीचे भागीदार विश्वास पंजियार म्हणतात. कुमार पुढे म्हणतात की, ज्या व्यक्तींचे गुंतवणूक उत्पन्न किंवा मालमत्ता विक्रीमुळे भांडवली नफा कर लागू शकतो त्यांच्यासाठी हे वेगळेपण महत्त्वाचे आहे, जरी त्यांचे उत्पन्न १२.७५ लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा कमी असले तरीही.

२. सीनियर सिटीझन्ससाठी मोठी घोषणा!

बँक व्याजावर करमुक्त मर्यादा ₹50,000 वरून ₹1 लाख करण्यात आली आहे.आता ज्येष्ठ नागरिक चार वर्षांपर्यंत अपडेटेड रिटर्न भरू शकतील .यापूर्वी ही मर्यादा फक्त दोन वर्षे होती जे आता वाढवून चार वर्षे करण्यात आली आहे. टीडीएस ची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे .ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावर सरसकट कर सवलत दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आली आहे.भाडेकर कर (टीडीएस) ची वार्षिक मर्यादा 2.40 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे.

३. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा

एज्युकेशन लोनवर कर नाही!
परदेशात पैसे पाठवण्याची मर्यादा ₹7 लाखवरून आणखी वाढवण्यात आली आहे.शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या या विधेयकात परदेशात पैसे पाठवण्यावर सुधारित कर गोळा केलेल्या स्त्रोतावर (TCS) दर लागू करण्यात आले आहेत, ज्यामुळे परदेशात शिक्षण घेण्याची योजना आखणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण खर्चावरील कराचा भार कमी करणारे हे बदल परदेशात शिक्षणासाठी निधी देणाऱ्या कुटुंबांसाठी आर्थिक सुलभता सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवतात. 

टीसीएस म्हणजे काय?

कर गोळा केलेला स्रोत (TCS) ही एक कर यंत्रणा आहे ज्यामध्ये विक्रेता विक्रीच्या वेळी खरेदीदाराकडून विशिष्ट टक्केवारीचा कर वसूल करतो. भारतातून येणाऱ्या परकीय रेमिटन्सच्या संदर्भात, TCS उदारीकृत रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत लागू आहे आणि जेव्हा व्यक्ती परदेशात निधी पाठवते तेव्हा अधिकृत डीलर्सद्वारे ते वसूल केले जाते.

४. भाडेकरूंसाठी मोठा फायदा

आता ₹6 लाख पर्यंतच्या भाड्यावर कोणताही TDS कापला जाणार नाही.
पूर्वी ही मर्यादा ₹2.4 लाख होती.

५. शेतकऱ्यांसाठी मोठी मदत

किसान क्रेडिट कार्ड (KCC) चा लोन लिमिट ₹3 लाख वरून आणखी वाढवण्यात आला आहे.
यामुळे ८ कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
सरकार शेतीसाठी PM धनधान्य योजना आणणार आहे, ज्यामुळे १०० जिल्ह्यांमध्ये शेती सुधारण्याची योजना आखली गेली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी आत्मनिर्भर. 100 जिल्हे कव्हर करणारी PM धनधान्य कृषी योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केलीये. तूर, उडीद, मसूर डाळींसाठी 6 वर्षांचे विशेष अभियान. 4 वर्षात केंद्रीय एजन्सी तूर, उडीद, मसूर खरेदी करतील, भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी बिहार योजनेत राज्यांसह मखाना बोर्ड स्थापन केले जाईल.किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता 3 लाखांवरून थेट 5 लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलीये. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलाय. 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड मिळणार असल्याची ही अर्थसंकल्पातील मोठी घोषणा आहेत. कृषी क्षेत्र आत्मनिर्भर करण्यावर सरकारचा अधिक भर असल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.

६. महिला उद्योजकांसाठी मोठा सपोर्ट!

महिला आणि SC/ST उद्योजकांना ₹1 कोटीपर्यंतचे लोन उपलब्ध होईल.
यामुळे ५ लाख महिलांना व लघु उद्योजकांना फायदा होईल.

७. स्टार्टअप्ससाठी मोठा फंड

नवीन स्टार्टअप्ससाठी ₹1000 कोटींचा फंड जाहीर करण्यात आला आहे.
MSME क्षेत्रासाठी क्रेडिट लिमिट ₹10 कोटींवर नेण्यात आली आहे.

८. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक

AI रिसर्चसाठी ₹500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
50,000 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स उभारल्या जातील, IIT मध्ये 6500 नवीन सीट्स आणि 10,000 टेक रिसर्च फेलोशिप जाहीर झाल्या आहेत.

९. आरोग्य आणि औषधांवरील सवलती

36 अत्यावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे.
10,000 नवीन मेडिकल सीट्स उपलब्ध करून दिल्या जातील.
गिग वर्कर्ससाठी आरोग्य विमा योजना लागू केली जाणार आहे.

१०. टूरिझम आणि इन्फ्रास्ट्रक्चरला चालना

50 प्रमुख टुरिझम स्पॉट्स अपग्रेड केले जातील.
बिहारमध्ये नवीन विमानतळ आणि फूड प्रोसेसिंग इन्स्टिट्यूटची घोषणा.
उडान योजना अंतर्गत 120 नवीन विमान मार्ग सुरू केले जातील.

भारताला ग्लोबल लीडर बनवण्याचा प्रयत्न!

न्यूक्लिअर एनर्जी मिशन अंतर्गत भारत 2047 पर्यंत 100 GW परमाणु ऊर्जा निर्माण करणार आहे.
यामुळे ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि ग्रीन एनर्जी क्रांती घडेल.

तर हा होता यंदाच्या बजेटचा संक्षिप्त आढावा.

मिडल क्लाससाठी हे बजेट आशादायक आहे का?
तुमचा काय विचार आहे? कमेंट करून सांगा!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *